Tuesday, March 28, 2023

Krapalu Sajjan Tumhi Santjana / कृपाळु सज्जन तुम्ही संतजन|

 कृपाळु सज्जन तुम्ही संतजन|

ऐवढे कृपादान तुमचे मज ||1||

आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा |
कींव माझी सांगा काकुळती ||2||

अनाथ अपराधी पतित आगळा |
परी पायां वेगळा नका करु ||3||

तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी |
मग मज हरी उपक्षेणा ||4||




No comments:

Post a Comment

Tujhi murti sundara deva | तुझी मूर्ती सुंदरा देवा

📜 Original Marathi Lyrics: तुझी मूर्ती सुंदरा देवा साजवितो सुरात लागे समदे मज स्वराचा जगता षडजा पंचमचि म्हणुनी कुंडले दुलावी तुझा भरी गंधार...