Sunday, October 30, 2022

Sukhache He Nam / सुखाचें हें नाम

संत चोखामेळा अभंग

 सुखाचें हें नाम आवडीनें गावें । 
वाचे आळवावें विठोबासी ॥१॥
संसार सुखाचा होईल निर्धार । 
नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥
कामक्रोधांचें न चलेचि कांही । 
आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥
आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि । 
णतसे महारी चोखियाची ॥४ ॥ 

No comments:

Post a Comment

Tirtha Vitthala | तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल

📜 Original Marathi Lyrics: तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥ माता विठ्ठल, पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल, गोत्र विठ्...