Sunday, October 30, 2022

Dasa Ramacha Hanumantha / दास रामाचा हनुमंत

नाम घेता मुखी राघवाचे
नाम घेता मुखी राघवाचे
दास रामाचा हनुमंत नाचे

अंजनी-उदरि जन्मला
भक्षिण्या रवि धावला
धावणे वायुपरी ज्याचे
रूप मेरूपरी घेउनी
तरू पाहे सिंधु लंघुनी
करुनिया दहन लंकेचे

जमवुनी वानरे सारी
बांधिला सेतू सागरी
बळ महान बाहुबलीचे
नित् रमे राम जपतपी
जाहला अमर तो कपी
गुण गाता रघुसेवकाचे

गीत - अण्णा जोशी
संगीत - नीळकंठ अभ्यंकर
स्वर - सुधीर फडक

No comments:

Post a Comment

Tujhi murti sundara deva | तुझी मूर्ती सुंदरा देवा

📜 Original Marathi Lyrics: तुझी मूर्ती सुंदरा देवा साजवितो सुरात लागे समदे मज स्वराचा जगता षडजा पंचमचि म्हणुनी कुंडले दुलावी तुझा भरी गंधार...