तुझ्या कृपेने दिन उगवे हा
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
करुनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना
सिंधूर वंदना तुजला नमितो दर्शन दे मजला
सिंधूर वंदना तुजला नमितो दर्शन दे मजला
विघ्न विनाशक म्हणती तुजला
विघ्न विनाशक म्हणती तुजला
तू आमुची प्रेरणा
वंदितो तुजला गजवदना
सर्व सुखाचा तू प्रभुदाता
सर्व सुखाचा तू प्रभुदाता
विद्येच्या देवा
जण जीवनी या तूच शुभंकरा, शुभदिन फुलवावा
गाउनी तव कवना
वंदितो तुजला गजवदना
No comments:
Post a Comment