A Beautiful Ganesh Bhajan
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता,मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया।
ओंकारा तू, तू अधिनायक,
चिंतामणी तू, सिद्धीविनायक,
मंगलमूर्ती तू भवतारक,
सर्वसाक्षी तू अष्टविनायक,
तुझ्या कृपेचा हात मस्तकी,
पायी तव मम चिंता,
देवा सरू दे माझे मी पण,
तुझ्या दर्शने उजळो जीवन,
नित्य कळावे तुझेच चिंतन,
तुझ्या धुळीचे भाळी भूषण,
सदैव राहो ओठांवरती,
तुझीच रे गुणगाथा
No comments:
Post a Comment