Thursday, September 1, 2022

Padmanabha Narayana / पद्मनाभा नारायणा

A Beautiful Takaram Marathi Abhang 

 पद्मनाभा नारायणा

श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा ॥१॥


सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा ।

महानंदा महानुभावा । सदाशिवा सहजरूपा ॥२॥


अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना ।

वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥३॥


तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं ।

हे चि करीतसें विनवणी । भवबंधनीं सोडवावें ॥४॥


गीत - संत तुकाराम

No comments:

Post a Comment

Tujhi murti sundara deva | तुझी मूर्ती सुंदरा देवा

📜 Original Marathi Lyrics: तुझी मूर्ती सुंदरा देवा साजवितो सुरात लागे समदे मज स्वराचा जगता षडजा पंचमचि म्हणुनी कुंडले दुलावी तुझा भरी गंधार...