तूच सूर ठावा मजसी तूच एक तरी - A Beautiful Marathi Bhajan
तूच सूर ठावा मजसी तूच एक तरी
सगुण रूप दावी देवा एकदा तरी
रंभ तूच यश किर्तीचा जीव मी गणेशा
दुख तीमीर दाटूनी येता तूच किरण आशा
तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी
लाल फूल दुर्वा शमी मी तुला प्रिय व्हावे
अष्ट गंध सिंधूर बनुनी मी तुला दिले पावे
उभा जन्म झीजूदे माझा चंदणा परी
शब्द रूप घेऊन सारे गीत तू बनावे
नाद मधुर ताला संगे स्वरांकित व्हावे
तान घेता मधुनी एक तूच सावरी
No comments:
Post a Comment