Friday, December 8, 2023

Deva Devanyata Nahi / देव देव्हार्‍यात नाही

देव देव्हार्‍यात नाही












देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी

देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई


देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदेकों दे

देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी

देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूताठायी


देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे

देव आपणांत आहे, शिर झुकवोनिया पाहे

तुझ्यामाझ्या जड देही, देव भरूनिया राही


देव स्वये जगन्‍नाथ, देव अगाध अनंत

देव सगुण निर्गूण, देव विश्वाचे कारण

काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही


गीत - ग. दि. माडगूळकर

संगीत - सुधीर फडके

स्वर - सुधीर फडके


https://www.youtube.com/watch?v=OtAxA1agOoc

No comments:

Post a Comment

He Shivanandana | ಹೇ ಶಿವನಂದನ ಹೇ ಶಿವನಂದನ

📜 Original Kannada Lyrics: ಹೇ ಶಿವನಂದನ ಹೇ ಶಿವನಂದನ ಹೇ ಗಿರಿಜಾಸುತೆ ಹೇ ಗಿರಿಜಾಸುತೆ ವಿಘ್ನವಿನಾಶಕ ಪಾಲಯಮಾಂ ಪಾರ್ವತೀಚ ನಂದನ ಮೋರಯಾ ಗಜಾನನ ಗಜವದನ ವಿಘ್ನವಿನಾಶ...