तो हा राम आठवावा ।
ह़दयांत सांठवावा |
रामचरणीची गंगा ।
महापातके जातीं भंगा |
रामचरणीची ख्याति ।
चिरंजीव हा मारुती |
चरण वंदी ज्याचे शिरी ।
बिभीषण राज्य करी || 1 ||
शबरीची बोरें खाय ।
मोक्ष दिला सांगूं काय |
रामदास म्हणे भावें ।
कथा कीर्तन करावें || 2 ||
https://www.youtube.com/watch?v=6NmWAAfCkNA&list=RDGMEMQvslUU5QcbUzJ7HyWoWAAA&index=2
No comments:
Post a Comment