अविरत ओठी यावे नाम
श्रीराम जय राम जयजय राम
रामनाम हे सदा सुखाचे
निधान जाणा परमेशाचे
पतितपावन अवघे नाम
श्रीराम जय राम जयजय राम
जानकीची जणू जीवन ज्योती
प्रभू रामाची कोमल मूर्ती
मंगल दर्शन पूर्ण विराम
श्रीराम जय राम जयजय राम
पंचप्राण हे पवनसूताचे
राम जणू नि:श्वास तयांचे
तनू संजीवन सुंदर धाम
श्रीराम जय राम जयजय राम
गीत - मनोहर कवीश्वर , संगीत - यशवंत देव , स्वर -
Crafted with by TemplatesYard | Distributed By Blogger Template