Thursday, February 2, 2023

Ek Tari Sange / एकतारीसंगे एकरूप झालो

 एकतारीसंगे एकरूप झालो


एकतारीसंगे एकरूप झालो

आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो


गळा माळ शोभे आत्मरूप शांती

भक्ति-भाव दोन्ही धरू टाळ हाती

टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो


भूक भाकरीची छाया झोपडीची

निवार्‍यास घ्यावी ऊब गोधडीची

माया-मोह सारे उगाळून प्यालो


पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला

कुणी राव होई, कुणी रंक झाला

मागणे न काही सांगण्यास आलो


गीत - जगदीश खेबूडकर

संगीत - सुधीर फडके











No comments:

Post a Comment

Tujhi murti sundara deva | तुझी मूर्ती सुंदरा देवा

📜 Original Marathi Lyrics: तुझी मूर्ती सुंदरा देवा साजवितो सुरात लागे समदे मज स्वराचा जगता षडजा पंचमचि म्हणुनी कुंडले दुलावी तुझा भरी गंधार...