Thursday, January 19, 2023

Karma karitha te Nishkam / कर्म करिता ते निष्काम

कर्म करिता ते निष्काम

कर्म करिता ते निष्काम, मुखी राहो विठ्ठल नाम

देह चंदनी देव्हारा, आत आत्म्यासी निवारा

मन नसावे मळीन, ते तो आत्म्याचे आसन

देह ईश्वराचे धाम, मुखी राहो विठ्ठल नाम

घाम श्रमाचा गाळावा, देह निगेने पाळावा

नको इंद्रियांचे लाड, काम-क्रोधाचे पवाड

पाळा नीतीचे नियम, मुखी राहो विठ्ठल नाम

स्वये तरी दुसर्‍या तारी, तरीच होई गा संसारी

देह सेवेचे साधन, देह वेचायाचे धन

श्रमी लाभतो विश्राम, मुखी राहो विठ्ठल नाम


गीत - ग. दि. माडगूळकर

संगीत - सुधीर फडके

चित्रपट - संत गोरा कुंभार



https://www.youtube.com/watch?v=mNo6VQiK9kY


No comments:

Post a Comment

He Shivanandana | ಹೇ ಶಿವನಂದನ ಹೇ ಶಿವನಂದನ

📜 Original Kannada Lyrics: ಹೇ ಶಿವನಂದನ ಹೇ ಶಿವನಂದನ ಹೇ ಗಿರಿಜಾಸುತೆ ಹೇ ಗಿರಿಜಾಸುತೆ ವಿಘ್ನವಿನಾಶಕ ಪಾಲಯಮಾಂ ಪಾರ್ವತೀಚ ನಂದನ ಮೋರಯಾ ಗಜಾನನ ಗಜವದನ ವಿಘ್ನವಿನಾಶ...