Abhang by Sant Namadev Maharaj
तुझा माझा करे वैराकर देवा
तुझा माझा करे वैराकर देवा | दुःखाचे डोंगर दाखविसी || १ ||
बळे बांधोनिया देशी काळाहाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ ||
आम्ही देवा तुझी केली होती आशा | बरवे ऋषिकेश काळो आले || ३ ||
नामा म्हणे देवा करा माझी कीव | नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ ||
No comments:
Post a Comment