A Beautiful Abhang by Sri ग. दि. माडगूळकर.
झाला महार पंढरीनाथ
झाला महार पंढरीनाथ
काय देवाची सांगू मात|
नेसला मळिण चिंधोटी
घेतली हातामधी काठी
घोंगघों डी टाकिली पाठी
करी जोहार दरबारात ||1||
मुंडाशात बांधिली चिठी
फेकतो दुरुन जगजेठी
'दामाजीनं विकली जी कोठी-
त्याचं घ्यावं दाम पदरात ||2||
खळखळा ओतिल्या मोहरा
'घ्या जी मोजून, पावती करा'
ढीग बघून चमकल्या नजरा
शहा घाली बोट तोंडा तों त ||3||
गीत - ग. दि. माडगूळकर
राग - काफी
No comments:
Post a Comment